अभिनय स्पर्धेत अन्वया काणे प्रथम
लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले स्त्री शाखेच्या वतीने आयोजित ‘एकपात्री अभिनय स्पर्धा’ दि. २८जाने२०२३ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत श्रीमती अन्वया काणे यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.अन्वया यांनी आनंदीबाई पेशवे यांची व्यक्तिरेखा साकारली. या संहितेचे लेखन अन्वया काणे यांनी स्वतःच केले होते. अन्वया काणे या पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमिक शाळेत मराठी भाषा अध्यापनाचे कार्य करतात.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनतर्फे अन्वया यांचे हार्दिक अभिनंदन.









