Deep Poojan
पार्ले टिळक इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) शाळेत २४ जुलै २०२५ रोजी आषाढ अमावस्येच्या निमित्ताने दीप पूजन करण्यात आले. तसेच दुसऱ्यादिवशी सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याचे स्वागत सुद्धा करण्यात आले. विद्यालयातील उपमुख्याध्यापिका यामिनी दळवी व कला शिक्षिका बीना गोडांबे यांनी फलकराव सुंदर सजावट करून दिव्यांची आरास केली. तसेच शिक्षिका दीक्षा वारोशे यांनी दीपपूजन आणि श्रावण या विषयांवर माहिती दिली.
‘ तमसो मा ज्योतिर्गमय ‘
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची वाटचाल या दीप पूजनाने केली जाते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी मिळून हे सारे विश्व निर्माण झाले आहे. या पंचमहाभूतांपैकी तेजाची केली जाणारी पूजा म्हणजे दीपपूजन होय.आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपपूजन केले जाते. ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते.
चातुर्मास व्रताला आषाढ महिन्यात सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष हे चार महिने. श्रावण महिना चातुर्मासातील श्रेष्ठ, पवित्र व सणांचा राजा म्हणून ओळखला जातो.
पार्ले टिळक इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) शाळेत साजरी करण्यात आलेली दीप अमावस्या विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव ठरली. दीपपूजन व श्रावण स्वागताच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा संदेश प्रभावीपणे दिला गेला. भारतीय सणांची पारंपरिक श्रद्धा, पंचमहाभूतांची ओळख आणि चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. हे उत्सव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कारांची ज्योत प्रज्वलित करणारे आणि आपल्या परंपरांची जाणीव करून देणारे ठरले.










