कथाकथन स्पर्धा
पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेच्या मराठी मंडळातर्फे मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी- सहावीसाठी संतकथा तर इयत्ता सातवी- आठवीसाठी देशभक्तांच्या कथा असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती स्वाती ठाकुरदेसाई आणि असं श्रीमती बीना गोडंबे यांनी केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अनेक मराठी कथांचे वाचन करून कथा निवडल्या आणि त्या कथांचे अतिशय उत्तम सादरीकरण केले.







