Write up on Condolence of late Dr. Snehlata Deshmukh Madam by Smita Biwalkar

Write up on Condolence of late Dr. Snehlata Deshmukh Madam by Smita Biwalkar

उपस्थित मान्यवर आणि पार्ले टिळक असोसिएशन परिवार –

नमस्कार ,

संस्थेच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने, संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयावरील प्रदर्शनाच्या निमित्ताने किवा शाळेतील काही कार्यक्रमाना पाहुण्या म्हणून येत असलेल्या डॉ .स्नेहलता देशमुख … या निमित्ताने   देशमुख मॅडम यांचा थोडाफार सहवास लाभला. त्यांच्यासारख्या विख्यात व्यक्तिमत्वाबरोबर बोलताना किंवा विचारांची देवाण घेवाण करताना सुरुवातीला माझ्या मनावर खूप दडपण येत असे.  पण त्या सुरुवातीपासूनच एखाद्या प्रदीर्घ काळासाठी परिचित व्यक्ती बरोबर बोलावे तसे सहज बोलत; त्यामुळे मनावरील दडपण कमी होत असे.  त्यांची मधाळ वाणी, चेहऱ्यावरील शांत आणि समाधानी भाव या मुळे त्यांच्याशी संवाद साधताना थोडे मोकळे वाटायचे. नवीन काळाप्रमाणे आपण बदलले पाहिजे हा त्यांचा  विचार होता. आमच्या शाळेतील प्राथमिक विभागाच्या आजीआजोबा दिवसासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या तेव्हा त्यांनी सर्व आजी आजोबाना आपण कालानुरूप बदलणे आवश्यक आहे हे  सांगितले होते. जुने विचार, संस्कृती जपलीच पाहिजे पण काळानुसार काही नवीन गोष्टी स्वीकारायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. शासनाकडून शिक्षण क्षेत्रात येणारे विविध नवीन उपक्रम त्या समजून घेत असतं आणि आपल्या शाळांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल या बाबत मोलाचे मार्गदर्शन करत   त्यांच्या नावात असलेला स्नेह त्यांच्या बोलण्यात, वागण्यात दिसत असे, त्यामुळे त्या सर्वाना आपलेसे करून घेत. वैद्यकीय  आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी धडाडीने कार्य केले तसेच त्यांनी विविध विषयावर लेखन तसेच काव्यलेखन सुद्धा केले आहे, मराठी भाषेची त्यांना गोडी होती तसेच संस्कृत भाषेवर ही  त्यांचे प्रभुत्व होते. 

अश्या या बहुआयामी वात्सल्य मूर्ती ला माझे  मन:पूर्वक वंदन.  

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow