कविकट्टा

कविकट्टा

१ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान  सातारा येथे संपन्न झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘कविकट्टा‘ या व्यासपीठावर सादरीकरणासाठी पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम मधील मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया अविनाश  काणे यांच्या  ‘अभिजात मराठी भाषा‘ या कवितेची निवड झाली. या कवितेच्या सादरीकरणासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दिनांक २ जानेवारी रोजी ‘कविकट्टा ‘ या व्यासपीठावर कवितेचे उत्तम अभिवाचन करून अन्वया काणे यांनी काव्यरसिकांची वाहवा मिळवली. या सादरीकरणाबद्दल ‘कविकट्टा‘ आयोजक समितीकडून साहित्य संमेलनाचे सन्मानचिन्ह , शाल आणि प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow