‘अभिजात मराठी भाषा सप्ताह‘
दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या निमित्ताने यावर्षी ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. शाळेतील ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मराठी भाषेतील उत्तमोत्तम कथा, कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी या सप्ताहात केले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेतील मराठी विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शब्दकोडी तसेच विविध भाषिक खेळांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या खेळांमध्ये सहभाग घेतला. शाळेतील मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया काणे यांनी या सप्ताहात केलेल्या भाषणात ‘अभिजात भाषा दर्जा , त्याचे निकष,मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य व महत्त्व तसेच मराठी भाषा संवर्धनाबाबत आपली जबाबदारी ‘ या पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी रचलेल्या ‘अभिजात मराठी भाषा गीताने‘ सप्ताहाची सांगता झाली.









