Maharashtra Day
दिनांक 1 मे 2026 रोजी पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षिका वृशाली वीरकर यांनी महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि अभिमानाचे प्रतीक असलेले महाराष्ट्र राज्यगीत गाऊन केली. यानंतर शाळेतील साहाय्यक शिक्षिका श्रीमती स्वाती ठाकुरदेसाई यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास प्रभावीपणे मांडला. तसेच महाराष्ट्राची ऐतिहासिक ,सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा यांची सखोल माहिती देत हाच वारसा पुढील पिढी देखील जोपासेल हा विचार व्यक्त केला. भावी पिढीला त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा हवा हे दीक्षा टीचर यांनी स्पृहा जोशी लिखित ‘मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा’ या गीतातून सादर केले. यानंतर संगीत शिक्षिका वृशाली वीरकर यांनी ‘ बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत मंत्रमुग्ध आवाजात सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक शिक्षिका श्रीमती सुखदा जोगळेकर यांनी केले.या कार्यक्रमाला मा. मुख्याध्यापिका स्मिता बिवलकर मॅडम, मा. उपमुख्याध्यापिका वसुंधरा पांडे मॅडम, मा. पर्यवेक्षिका विनिता नायर मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती.संपूर्ण कार्यक्रम श्रोत्यांच्या मनात राज्यगौरवाची भावना जागवणारा ठरला.









