Teachers Achievement
Anvaya Kane Teachers Achievement
भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेतील मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया अविनाश काणे यांच्या कवितेला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.
‘ नावाच्या आद्याक्षरांवरून कविता’ असा विषय काव्यलेखनासाठी देण्यात आला होता. तसेच कवितेत वर्षा ऋतूतील निसर्गवर्णन येणे, कविता लयबद्ध, अर्थपूर्ण असणे अपेक्षित होते. या सर्व अटी पूर्ण करणारी कविता श्रीमती अन्वया काणे यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून लिहिली.







