Teacher Anwaya Kane contribution

Teacher Anwaya Kane contribution

**पाठ्यपुस्तक निर्मिती कार्यात श्रीमती अन्वया काणे यांचे योगदान **
        भारताच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी ते दहावी या इयत्तांची द्वितीय भाषा मराठी विषयांची पुस्तके तयार करण्याच्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे या संस्थेच्या मराठी भाषा समितीवर ‘पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल’ या शाळेच्या मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया काणे यांची नियुक्ती झाली. 
या समितीने तयार केलेले इयत्ता सहावी मराठी द्वितीय भाषेचे ‘ शिकू मराठी आनंदाने’ हे पाठ्यपुस्तक नुकतेच अभ्यासक्रमात आले.समिती सदस्य या नात्याने या पाठ्यपुस्तकातील काही पाठांचे लेखन श्रीमती अन्वया काणे यांनी स्वतः केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील मराठी विषय शिक्षकांसाठी या पाठ्यपुस्तकासंदर्भात  मार्गदर्शनपर व्हिडिओ निर्मिती करण्याची  महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. पार्ले टिळक विद्यालय संस्थेसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
 
 
 
 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow