‘पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल ‘ या शाळेच्या  माध्यमिक विभागातर्फे दिनांक २४-७-२०२६ रोजी ‘आषाढी एकादशी‘ चा रंगतदार सोहळा संपन्न झाला.

‘पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल ‘ या शाळेच्या  माध्यमिक विभागातर्फे दिनांक २४-७-२०२६ रोजी ‘आषाढी एकादशी‘ चा रंगतदार सोहळा संपन्न झाला.

‘पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल ‘ या शाळेच्या  माध्यमिक विभागातर्फे दिनांक २४-७-२०२६ रोजी ‘आषाढी एकादशी‘ चा रंगतदार सोहळा संपन्न झाला. 
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. स्मिता बिवलकर,
उपमुख्याध्यापिका मा. वसुंधरा पांडे आणि पर्यवेक्षिका मा. विनीता नायर यांच्या उपस्थितीत शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात कार्यक्रम साजरा केला. शाळेचे कलाशिक्षक श्री. विठ्ठल चव्हाण यांनी फलकावर साकारलेली विठ्ठलाची सुंदर प्रतिमा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. कलाशिक्षिका श्रीमती गीतांजली महाले यांनी विठोबा आणि वारीच्या विविध चित्रांनी फलक सजावट केली होती.
शाळेतील मराठी विषय शिक्षिका श्रीमती अन्वया काणे यांनी केलेल्या आषाढी एकादशीचे आणि पंढरपूरच्या वारीचे धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व विशद करणाऱ्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कवयित्री मृणालिनी कानिटकर- जोशी लिखित ‘ वारी‘ या सुंदर कवितेचे अभिवाचनही त्यांनी याप्रसंगी केले.
यानंतर शाळेच्या संगीत शिक्षिका श्रीमती वृशाली वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ ज्ञानियांचा राजा‘ या संत तुकारामांच्या अभंगाचे सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका मा. वसुंधरा पांडे यांनी केले.यानंतर वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी चिपळ्या , लेझीम, ढोलताशे अशा संगीताच्या साथीने विठोबा- रखुमाईसह सुरेख अशी दिंडी सगळ्या वर्गात नेऊन वातावरण भक्तिमय केले. या दिंडीचे उत्कृष्ट आयोजन शाळेतील शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र पाटील आणि श्री. परेश इप्ते यांनी केले होते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रभूमीत जन्म घेऊन समाजाला आपल्या कार्याने चिरंतन मूल्यांची अमूल्य देणगी देणाऱ्या संतांच्या मोलाच्या कार्याचा परिचय करून देणारे  ‘ संतकृपा झाली‘  हे श्रीमती अन्वया काणे लिखित दिग्दर्शित संगीतनाटक विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर केले. विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदाच्या साथीने स्वतः गायलेल्या संतांच्या अभंगरचना हे या नाटकाचे खास वैशिष्टय ठरले. संगीत संयोजनाची ही महत्त्वाची जबाबदारी डॉ. विज्ञापना गोकर्णकर यांनी समर्थपणे पेलली.
‘ संतांनी समाजाला दिलेली मूल्ये चिरंतन आहेत आणि आजच्या अनेक समस्यांवरचे उपाय आपल्याला या संतरचनांमध्ये सापडतात ‘ हा महत्त्वाचा संदेश या नाटकातून विद्यार्थ्यांना मिळाला.
एकंदरीत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून सुफळ संपूर्ण झालेला हा ‘आषाढी एकादशी‘ चा हा देखणा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow