Tilak Jayanti

Tilak Jayanti

लोकमान्य श्री बाळ टिळक

       निज राष्ट्राचे आधार

        समाजसेवा श्रेय मानुनि

         त्याग एकता ध्येय मानुनि

मंत्र घोषिला,”स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार”

 दिनांक २३ जुलै२०२६ रोजी  थोर लोकनेते ,भारतीय असंतोषाचे जनक आणि सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेत उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला मा. मुख्याध्यापिका स्मिता बिवलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मराठी वाङ्मयमंडळातर्फे दिनांक २२जुलै रोजी कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती. या कथाकथन स्पर्धेतील दोन उत्कृष्ट कथा इयत्ता सहावी  अ मधील शार्दुल केकरे आणि इयत्ता सहावी  ब मधील अर्नेश खरे यांनी सादर केल्या. यानंतर इयत्ता आठवी  ड मधील आयुषी वाळवे हिने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कवी श्री वसंत तुळजापूरकर यांची लोकमान्य टिळकांच्या कार्याचे यथार्थ वर्णन करणारी कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषय शिक्षिका सुखदा जोगळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापिका मा. वसुंधरा पांडे मॅडम, पर्यवेक्षिका मा. विनीता नायर मॅडम आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

लोकमान्य टिळकांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

 

 

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow